नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलिकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमीहीनांना मिळेल शासनाकडून हक्काचे शेत तर या योजनेसंदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
मित्रांनो या योजनेचा लाभ अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकतील भूमिहीन नागरिकांना दिल जातो. या योजनेचा मोठा लाभ दारिद्र्यरेशेखालील गोरगरिबांना होऊ लगला आहे.
या योजनेंतर्गत भूमीहीनांना शेत विकणाऱ्या शेतकऱ्यांना समाज कल्याण विभागाकडे महितीसह प्रस्ताव सादर करावा लागतो.
हे देखील वाचा : ठिबक अनुदान योजना 90 टक्के मिळणर अनुदान करा अर्ज
भूमीहीनांना मिळेल शासनाकडून शेती
अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकतील दारिद्र्यरेशेखालील भूमिहीन शेत मजुरांना दोन एक्कर ओलीताखालील किंवा चार एक्कर कोरडवाहू शेतजमीन कसण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते.
या भूमिहीन नगरिकांनाची आर्थिक स्थिति उंचविण्याचा उद्देश कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलिकरण व स्वाभिमान योजनेचा आहे.
या योजनेंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जात आहे.
चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर ओलित जमीन मिळते.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड संबलिकरण व स्वाभिमान योजनेत शासनाकडून भूमिहीन अनिसुचीत जाती प्रवर्गातील दारिद्र्यरेशेखालील शेतमजूर कुटुंबाला जमीन मिळते.
ही जमीन चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन अनुदानावर दिली जाते.
बीड येथे समाज कल्याण विभागाकडे एप्रिल 2022-23 या वर्षात केवळ चार अर्ज प्राप्त झाले आहे
अर्जदरानी दाखल केलेल्या गावातून प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल.
प्रस्ताव सादर करणाऱ्या जमीन मालकास शासनाच्या रेडिरेकरण नुसार रक्कम दिली जाते अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
काय आहे योजनेचा उद्देश आणि निकष
राज्यातील भूमिहीन शेतमजुरांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही एक योजना आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे लागते व कमाल वय 60 वर्षापर्यंत निश्चित केले आहे.
लाभार्थी हा भूमिहीन व दारिद्र्यरेशेखालील शेतमजूर असला पाहिजे.
विधवा स्त्री यांना या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे.
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा