ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेतर्गत आता शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
ट्रॅक्टरचा उपयोग शेतीमध्ये मोठ्या प्रमाणत होत असला तरी पावसाळा ऋतूमध्ये शेतामध्ये ट्रॅक्टरचा उपयोग करण्यास मर्यादा येते. त्यामुळे मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेतल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटणाचे आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची साधने 90 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पात्र बचत गटांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
आणखी कामाची योजना रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु.
ट्रॅक्टर अनुदान योजना 90 टक्के अनुदान
स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांना आर्थिक स्रोत उपलब्ध होऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जात आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना मर्यादा 3.50 लाख एवढी असून 90 टक्के म्हणजेच आनुदानाची रक्कम 3.15 लाख एवढी आहे.
कोणाला मिळणार लाभ ?
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेचा लाभ मिळेल यातील अध्यक्ष व सचिवासह 80 टक्के सदस्य याच गटातील असावेत.
काय काय मिळणार ?
9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची साधने मिळणार आहे अधिक अश्वशक्ति ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर वरील रक्कम बचत गटांना भरवी लागणार आहे.
कागदपत्रे काय लागतात ?
- गट नोंदणी छायांकित प्रत .
- बचत गटाचे बँक पासबूक.
- जातीचा दाखला.
- आधार कार्ड.
- रेशन कार्ड.
- सदस्यांचा पूर्ण फोटो.
- हमी पत्र
वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागतील.
अधिक माहितीसाठी बातमी वाचा
मिनी ट्रॅक्टर योजना अटी खालीलप्रमाणे
जे स्वयंसहाय्यता बचत असणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील नागरिक असावेत.
स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
बचत गटातील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे गरजेचे आहे.
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच आवश्यक असणारे साहित्य यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रु. 3.50 लाख इतकी असेल,
स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.
जाणून घ्या अर्ज कोठे करावा लागणार.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत आणि या साठी कोणत्या अटी दिलेल्या आहेत हे आपण जाणून घेतलेले आहे. आता जाऊन घेवूयात कि या योजनेसाठी ऑनलाईन आज करण्यासठी कोठे अर्ज करावा लागतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयास तुम्हाला भेट द्यायची आहे. या कार्यालयामध्ये तुम्ही ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.